श्री क्षेत्र पैठणकडून वारकऱ्यांना २६ वर्षांपासून अखंडीत मोफत आयुवेर्दिक चहा पाण्याची सेवा

Foto
पैठण, (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा २०२६ आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी श्री क्षेञ पैठणकडून २६ वर्षापासुन अॅड. किसनराव फटांगडे यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी अध्यक्ष अॅड. अमीत फटांगडे हे मोफत आयुवेर्दिक चहा, पाणी व बिस्कीट सेवा पुरवत आहेत.

२६ वर्षापुर्वी अॅडव्होकेट किसनराव फटांगडे मामा हे स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सोबत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतांना त्यानी अनुभवले की लाखो वारकर्यांना पाऊस, उन, वारा अशुद्ध पाण्यामुळे सर्दि, पडसे, खोकला, अंगदुखी, ताप या सारखे आजार होऊन पायीवारी अर्ध्यातच सोडावी लागते. यावर उपाय म्हनुन त्यांना कल्पना सुचली की, आपण वारकर्यांना सुंठ, दालचिनी, विलायची, जायफळ, मीरी, वापरुन आर्युवेदिक चहा बनवुन उपलब्ध करुन दिला. शुध्द पिण्याचे पाणी दिले तर वारकर्यांना त्याचा फायदा होईन व वारी अर्ध्यातच सोडन्याची वेळ येनार नाही. या कल्पनेचे रूपांतर अडव्होकेट फटांगडे मामा यांनी सत्यात ठेऊन मागील २६ वर्षा पासुन हि सेवा निरंतर आज तागायत चालु आहे.

यासाठी साखर १० क्विंटल, चहा पत्ती २५ कीलो, दुध ५०० लीटर (अमोल गोल्ड टेट्रा), बिस्कीट ३५ खोके, गस टाकी १३, एक पाणि टूकर, एक ट्रक चहा मसाला यामध्ये सुठं ३ कीलो, दालचिनी १ किलो, विलायचीनी १ कीलो, जायफळ १ कीलो, मीरी १ कीलो, १७ पुरुष सेवेकरी व ३ महिला सेवेकरी अशा संच्यासह रोज साधारण १० ते १२ हजार कप चहा वारकर्यांना मोफत दिला जाते.

पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्द करुन दिले जाते. ही सेवा सतत १५ दिवस दिली जाते. सदर उपक्रमास चांगला प्रतीसाद मिळत असुन वारकरी आवर्जुन व शिस्तीत रांगेत येऊन नाथ महारांजांचा प्रसाद समजुन ही सेवा स्विकारत आहे. २० सेवेकरी कोनताही मोबदला न घेता सेवाभावातुन ही सेवा पुरविन्यासाठी श्रमदानातुन मदत करतात. 

या सेवेकर्यांमध्ये प्रामुख्याने दशरथ खराद, विस्तार विकास अधिकारी (पंचायत) पंचायत समिती संभाजीनगर, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी, प्रगतीशील शेतकरी पांडुरंग औटे आपेगांव, पैठणचे व्यापारी हरीभाऊ तुपे, विजय सारडा, विजय परदेशी, अॅड वैभव चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे एल आयसी प्रतिनिधी किशोर भुजबळ, संगम ट्रान्सपोर्टचे मालक कैलास परदेशी, मच्छिंद्र गोरे, विठ्ठल गोरे, मच्छिंद्र गलधर, ट्रक चालक मालक रमेश घाटविसावे, टँकरचालक अप्पासाहेब दळवे, इंजिनिअर संकेत मिसाळ, गोदावरी जामदार, जनाबाई बोंबले व राधाबाई काळे, यांचा समावेश आहे. 

या उपक्रमासाठी जे सेवेकरी आहेत. ते शासकीय नोकर, व्यापारी, प्रगशील शेतकरी, मजुर, वकील आहेत हे सर्व दरवर्षी १५ दिवस सुट्टी टाकुन, व्यापार सोडुन, मजुरी बुडवून निष्काम सेवा करत आहेत.

या अभीनव उपक्रमास लागनारा सर्व खर्च अॅड. किसनराव फटांगडे हे स्वतः करतात, यासाठी कुठलीही देनगी, दान स्वीकारले जात नाही. या उपक्रमास स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा समीती सदस्य, भालदार चोपदार यांनी भेट देऊन मोफत चहा व पाणी सेवेची प्रशंसा करत आहेत. या समुहाचे कार्यकारी अध्यक्ष अड अमित फटांगडे, विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती संभाजीनगर दशरथ खराद, पाडुरंग औटे, अॅड वैभव चव्हाण, हरीभाऊ तुपे, इंजिनीयर संकेत मीसाळ, मच्छिंद्र गोरे परिश्रम घेत आहेत.